ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अपघाताचा थरार : बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसाला चारचाकीने उडविले

बीड : वृत्तसंस्था

बीड शहरातील एका पोलिस उपनिरीक्षकालाच परीक्षेच्या बंदोबस्तसाठी जाताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने उडवले आहे. यामध्ये या पोलिस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मच्छिंद्र नन्नवरे असे त्यांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील नेकनूरच्या जवळ हा अपघात झाला आहे. नेकनूर पासून जवळच असलेल्या नन्नवरे वस्तीतून पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी नन्नवरे जात होते. मात्र नेकनूर – मांजरसुंबा रस्त्यावर नेकनूर पासून जवळच कालिका मंगल कार्यालयासमोर नेकनूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. विशेष म्हणजे समोरच्या दिशेने येत असलेल्या या गाडीने समोरून धडक दिल्याने नन्नवरे खाली पडले. तसेच कारही पुढे रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.

दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हा अपघात नेमका कसा झाला याबाबत स्पष्टपणे दिसत आहे. रविवारी सकाळी ही अपघाताची घटना घडली आहे. अपघात होताच कारचालक फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. कालिका मंगल कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेरेत ही घटना कैद झाली आहे. घटनेने नन्नवरे वस्ती व नेकनूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!