---Advertisement---

त्या टोकावरून कडेलोट होण्याचा क्षण जवळ ; ठाकरे गटाची टीका

By team
On: July 9, 2024 10:10 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र आज सोडले आहे. यासोबत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. मुख्यमंत्री मिंधे यांचा लाळघोटेपणा टोकाला गेला आहे व त्या टोकावरून कडेलोट होण्याचा क्षण जवळ आला आहे अशी टीका तसेच मोदी यांच्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही असे मिंधे म्हणत असले तरी देशाच्या जनतेनेच मोदी यांचे बहुमत घालवून मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचा मेळा जमवत आहेत हे सिद्ध केले आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

”महाराष्ट्रावर लाखो कोटींचे कर्ज चढले असताना मिंधे हे ठेकदारांच्या फायद्यासाठी चढय़ा भावाने ‘टेंडर’ काढत आहेत. समृद्धी महामार्गापासून ते कोस्टल रोडच्या कामापर्यंत फक्त कट-कमिशनच आहे. त्यामुळे मिंधे म्हणतात ते खरेच आहे. मोदी यांच्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही असे मिंधे म्हणत असले तरी देशाच्या जनतेनेच मोदी यांचे बहुमत घालवून मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचा मेळा जमवत आहेत हे सिद्ध केले आहे. मोदी यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व लोक आज ‘टीम मोदी’मध्ये सुखाने नांदत आहेत. मिंधे व त्यांचे लोकही त्यात सामील आहेत. त्यामुळे मिंधे यांचा लाळघोटेपणा हा त्यांच्या मजबुरीतून आला आहे. कट, कमिशन, भ्रष्टाचार याच सूत्रामुळे दहा वर्षे मोदी-शहांनी राज्य केले व देशभरात अनेक मिंधे जन्मास घातले. मिंधे यांनी लाळघोटेपणा केला तरी मोदी यांचा भ्रष्टाचार लपून राहिलेला नाही. तो बाहेर आलाच आहे!”, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!