---Advertisement---

रील बनविण्याच्या नाद, कार वरील नियंत्रण सुटले ; दोन तर ठार

By team
On: July 10, 2024 5:12 PM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

शहरात मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास कोराडी पांजरा परिसरात कारमध्ये रील तयार करण्याच्या नादात कार वरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकला धडकुन दोन तरुण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, पहाटेच्या सुमारास मित्राकडे पार्टी करून रात्री फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणांच्या गाडीला अपघात झाला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कार रस्त्यावर असणारे सहा बॅरिकेट तोडत दुभाजकावर जाऊन आदळली या दोन विद्यार्थी ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे पीएम संजय भोंगाडे यांचा मुलाचा समावेश असल्याची माहिती आहे. जखमी मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काही मित्र हे रात्री मित्राकडे पार्टी करून फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी गाडीत त्यांनी रील तयार करण्यासाठी मोबाइल काढला. रील तयार करण्याच्या नादात चालकाचे गडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटणस्थळांचा पंचनामा केला आहे. तर जखमींना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!