---Advertisement---

दरीत कोसळून दोन महिला ठार , २५ जण जखमी

By team
On: July 13, 2024 6:41 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने अपघाताची देखील मालिका घडत आहे. नुकतेच जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बस दरीत कोसळून दोन महिला ठार झाल्‍या असून, २५ जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात आज दि.१३ बस दरीत कोसळून दोन महिला ठार झाल्‍या असून, २५ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी ९ जणांची प्रकृती गंभीर आहे.

खासगी बस भालेसाहून थाथरीला जात होती. सकाळी साडेदहाच्‍या सुमारास भाट्याजवळ बस २०० फूट खोल दरीत कोसळली. एक महिला जागीच ठार झाली तर दुसरीचा उपचार सुरु असताना मृत्‍यू झाला. अन्य नऊ जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर डोडा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!