---Advertisement---

महाराजांचे संकल्पित कार्य स्वराज्याच्या हितार्थ शंभूराजेंनी केले ; प्रा. नितीन बानगुडे-पाटील

By team
On: July 16, 2024 9:31 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

छत्रपती संभाजीराजे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी स्वराज्याची पहिली मुद्रा उमटवली, १८ व्या वर्षी युवराज झाले. त्या काळात त्यांनी विविध क्षेत्रात केलेले कार्य हे उल्लेखनीय होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे संकल्पित कार्य स्वराज्याच्या हितार्थ शंभूराजेंनी केले असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, सोमवार दि. १५ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. ख्यातनाम व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर व्याख्यानाने ५ वे पुष्प संपन्न झाले.

पुढे बोलताना प्रा.बानुगडे-पाटील यांनी म्हणाले की, शिवरायांडून कसे जगावे हे शिकावे तर संभाजी राजांकडून कसे मरावे हे शिकावे. प्रतिकूल परिस्थिती अनकूल कशी करावी हे छत्रपती संभाजी राजांचे चरित्र अभ्यासले की लक्षात येतो. आपला इतिहास उज्जवल आहे. तसाच आपला वर्तमान व भविष्यकाळही उज्जवल करता आला पाहिजे, असे यावेळी म्हणाले. शंभूराजेंचा धगधगता इतिहास सांगून उपस्थित श्रोते गणांना प्रा.बानुगडे-पाटील यांनी मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सो.म.पा माजी उपमहापौर दिलीपभाऊ कोल्हे, दहीटणेचे शिवाजीराव पाटील (सर), भाजपा नेते रमेश सिद्रामप्पा पाटील, जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, जेष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर, डॉ.आर.व्ही.पाटील, राजीव माने, बाळासाहेब मोरे, अॅड.संतोष खोबरे, अविराज सिद्धे, विजय पोखरकर, जवहार जाजू, शेखर फंड, श्रीशैल होळ्ळे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.

अन्नछत्र हे संवेदनशीलतेचे प्रतिबिंब :
अन्नदान हे श्रेष्ठ दान असून, तीर्थक्षेत्र अक्कलकोटात स्वामी भक्तासाठी जन्मेंजयराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्थापन करून, एक मातृत्व संस्था म्हणून त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्याबरोबरच समाज उपयोगी कार्य त्यांच्या हातून घडत आहे. अन्नछत्र हे संवेदनशीलतेचे प्रतिबिंब आहे.

गुणीजन गौरव : दुय्यम उपनिंबक डी.डी.चाटे, के.एल.ई.मंगरुळे प्रशालेचे मुख्याध्यापक नंदाजी कदम, स्थापत्य अभियंता राजसो शेळके, शिक्षक मनोज जगताप यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

दि. १६ जुलै रोजी मंगळावर सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘किर्तन’ राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांचा कार्यक्रम होणार आहे.

याप्रसंगी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, हिरकणी संस्थेच्या जयश्री मगर, स्वाती निकम, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, कोमल क्षीरसागर, सुवर्णा घाडगे, छाया पवार, व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, लाला राठोड, राजेंद्र लिंबीतोटे, डॉ.मनोहर मोरे, संतोष भोसले, सुधाकर गोंडाळ, बाबुराव कुलकर्णी, सुनील गोरे, संजय फुटाणे, शिवराज स्वामी, मनोज निकम, सौरभ मोरे, ओंकारेश्वर उटगे, प्रा.शरणप्पा आचलेर, अरविंद शिंदे, शीतल फुटाणे, राजु नवले, प्रविण देशमुख, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अमित थोरात,स्वामीराव सुरवसे, दिग्विजय कळसकर, प्रदीप तोरस्कर, दिंगबर डांगे, मनोहर चव्हाण, बाळासाहेब घाटगे, पिंटू साठे, बालाजी पाटील, गोविंद शिंदे, वैभव मोरे, प्रथमेश पवार, अतिश पवार, ज्ञानेश्वर भोसले, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!