---Advertisement---

टायर फुटल्याने भीषण अपघात : कारचा चक्काचूर, तरुण ठार

By team
On: July 18, 2024 1:27 PM
Follow Us:
---Advertisement---

बारामती : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच बारामती तालुक्यातील पालखी महामार्गावर लिमटेक ते बारामती दरम्यान एका कारचे टायर फुटून भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला. बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावरील रुई लीमटेक या मार्गावर मंगळवारी दुपारी कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की संपूर्ण गाडीचा चक्काचूर झाला. आदित्य निंबाळकर (वय २३) असे मृत तरूणाचे नाव असून तो इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आहे. या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य निंबाळकर हा काटेवाडीहून रुई मार्गे बारामतीकडे निघाला होता. मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास बारामती तालुक्यातील रूईपाटी जवळ आल्यानंतर अचानक त्याच्या कारचा टायर फुटला आणि त्यामुळे कार पलटी झाली. आणि महामार्गावरून घसरत जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका इमारतीवर जाऊन आदळली. या अपघातात आदित्य निंबाळकर गंभीर जखमी झाला, त्याला उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथे उपचारांदरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की कारचाही चक्काचूर झाला आहे.

आदित्यच्या अशा अकस्मात मृत्यूमुळे निंबाळकर कुटुबियांवर शोककळा पसरली आहे. तर संपूर्ण बारामतीतही या घटनेमुळे शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान लिमटेक ते बारामती दरम्यान पालखी मार्गाचे काम झाल्यामुळे या मार्गावरून चार चाकी दुचाकी गाड्या भरधाव वेगाने जातात. या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांनी वेगाला मर्यादा पाळण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!