मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्यासांठी आज आंतरवाली सराटीत पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. मराठा समाजाला दगा दिल्याने पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी पोलिसांनी मराठा विद्यार्थ्यांवर खुल्या प्रवर्गातून सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली आहे. जे लोक बोगस कागदपत्रे सादर करतात त्यांना तुम्ही आयएएस करत आहात आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडे खरी कागदपत्रे असताना अन्यात सुरू आहे, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला मराठा, धनगरांना आरक्षण द्यायचे नाही. दलितांना न्याय दिला जात नाही. बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग केला जात नाही. मुस्लिमांनाही आरक्षण दिले जात नाही, अशा सर्वांनाच आरक्षण द्यायचे नाही. लाडकी बहीण, लाडकी भाऊ योजना आणल्या. आता लाडका मेहुणा आणि लाडकी मेहुणी या योजना आणतील, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सगळी कागदपत्रे असताना पोलिसांनी मराठा समाजाच्या उमेदवारांकडून खुल्या प्रवर्गातून चाचणी देणार असल्याची संमतीपत्र जबरदस्ती लिहून घेतली आहेत. काही जातीयवादी पोलिस अधिकाऱ्यांकडून हे प्रकार सुरू आहेत. काही लोक बोगस कागदपत्रे सादर करत आएएएस बनत आहेत मात्र, आमच्याकडे खरी कागदपत्रे असूनही अन्याय होत आहे.