अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ..! मन हा मोगरा…!, स्वामी तुझ्या नावाने..!, माझी आई अक्कलकोटी..!, जय जय स्वामी समर्थ..!!, विठ्ठल..! विठ्ठल..!!, देशभक्तीपर, भक्ती व भावगीतासह चित्रपटातील मराठी-हिंदी गीते श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सूर भक्तीचे उमटले भक्ती संगीत ह्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवनिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, दि. २० जुलै रोजी शनिवार सायंकाळी ७ वा. श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सुर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत ह्या कार्यक्रमाने १० वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन न्यासाचे विश्वस्त अण्णा थोरात पुणे, भरत मित्र मंडळाचे बाळासाहेब दाभेकर, शिरीष मावळे पुणे, मदनिपाशा जुनैदी –आगार व्यवस्थापक, श्री व सौ अनिल पाटील ठाणे, प्रकाश पडवळकर, भाऊसाहेब घाडगे, धनंजय वाडकर, अनिल सपकाळ वरळी, योगेश अहंकारी, महेश कुलकर्णी, मल्लिनाथ करपे, सिद्धराम गणेश गोब्बुर –विलासआप्पा सुरवसे – माजी सरपंच-बोरगांव दे, नितिनी मोरे – सरपंच दहिटणे, रामजी समाणे- माजी नगरसेवक, अमर सिरसाट- शहर अध्यक्ष प्रहार संघटना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. भरत मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने अमोलराजे भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
गुणीजन गौरव :
मिडिया नियोजन –प्रशांत भगरे, सोमशेखर जमशेट्टी, स्टेज नियोजन – स्थापत्य अभियंता अमित थोरात, गुणवंत विद्यार्थी सत्कार व उत्कृष्ठ नियोजन – अरविंद शिंदे, शांतप्पा कलबुर्गी, संगणक ऑपरेटर- प्रसाद हुल्ले, मुख्य सुरक्षा रक्षक – महादेव अनगले, सह.मुख्य सुरक्षा रक्षक – अनिल गवळी, मंडप कॉनट्रक्टर – राऊत, स्क्रिन ऑपरेटर – गोविंद केकेडे, साउंड ऑपरेटर – संदीप सरवदे, लाईट ऑपरेटर – जोगदंड, फोटोग्राफी – ज्ञानेश्वर भोसले, मंडप नियोजन – कल्लप्पा छकडे यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, अनुयाताई फुगे-पाटील, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, हिरकणी संस्थेच्या स्वाती निकम, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, सुवर्णा घाडगे, छाया पवार, व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, संदीप फुगे-पाटील, संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, मनोज निकम, सिद्धेश्वर मोरे, अप्पा हंचाटे, पिंटू साठे, सनी सोनटक्के, गणेश भोसले, प्रा.शरणप्पा आचलेर, राजु नवले, निखील पाटील, पिंटू दोडमनी, प्रवीण घाडगे, गोटू माने, सौरभ मोरे, वैभव मोरे, रोहित खोबरे, रोहन शिर्के, शिवराज स्वामी, परेश परब मुंबई, अतिश पवार, प्रितेश किलजे, गोविंद शिंदे, किरण पाटील, अशोक मलगोंडा, विराज माणिकशेट्टी, योगेश पवार, प्रा. प्रकाश सुरवसे, निशांत निंबाळकर, बाळासाहेब घाटगे, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, ज्ञानेश्वर भोसले, फहीम पिरजादे, महेश कुलकर्णी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन अरविंद शिंदे व अॅड.संतोष खोबरे यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.
दि. २१ जुलै रोजी गुरूपौर्णिमे निमित्त रविवारी सकाळी ७ ते ९ पर्यंत महाप्रसादगृह येथे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० पर्यंत नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वा. खालील मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती व महानवैद्य दाखविण्यात येणार आहे.
नूतन महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ :
दि. २१ जुलै रोजी रविवार सकाळी ११ वा. गुरूपौर्णिमे निमित्त नियोजित ५ मजली भव्य अशा महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व नागपूरचे उद्योजक आशिष फडणवीस यांच्या हस्ते व सोलापूरचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील, राज्य अधिस्वीकृती समिती, महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष व दै.लोकमत, मुंबईचे सहयोगी संपादक यदुभाऊ जोशी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, कायदेविषयक सल्लागार व जेष्ठ विधिज्ञ अँड. नितीन हबीब सोलापूर, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, कैलास वाडकर (देणगीदार व पालखी संयोजक शिरवळ, पुणे), अतुल शिंदीकर (देणगीदार, ठाणे प.) यांच्या हस्ते आणि अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
दि. २१ जुलै रोजी रविवार सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद, सायं ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या भव्य मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात आणि अतुल बेहरे पुणे यांच्या ‘नांदब्रम्ह’ या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ बाळासाहेब दाभेकर –अध्यक्ष भरत मित्र मंडळ पुणे,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. मा.स्थायी समिती चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा.मा.शिक्षण सभापती संकेत पिसे, कासुर्डी (खे), ता.भोर, जि. पुणेचे देणगीदारसंतोष कोंडे यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.