गुरूपौर्णिमेनिमित्त ६० कोटीच्या ५ मजली महाप्रसादगृह इमारतीचे भूमिपूजन
अक्कलकोटच्या विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण ; उपमुख्यमंत्री फडणवीस !
अक्कलकोट : प्रतिनिधी
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा ३७ वा. वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबरच रु. ६० कोटीच्या नियोजित ५ मजली भव्य अशा महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवारी मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ ग्राफीच्या माध्यमातून भूमिपूजन कार्याला शुभेच्छा दिल्या.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असीमकृपेने, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शन, प्रमुख उपस्थितीत व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ हे ३७ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करुन नेत्रदीपक वाटचाल करीत आहे.
दरम्यान गुरूपौर्णिमेनिमित्त सकाळी ७ ते ९ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा संपन्न झाले. अन्नछत्र मंडळाच्या नियोजित ५ मजली भव्य अशा महाप्रसादगृह इमारतीचा भूमिपूजन समारंभ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे मुख्य पुरोहित मोहन पुजारी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, राज्य अधिस्वीकृती समिती, महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष व मुंबईचे जेष्ठ पत्रकार श्री व सौ. यदुभाऊ जोशी, कायदेविषयक सल्लागार व जेष्ठ विधिज्ञ अँड. नितीन हबीब सोलापूर, अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, श्री व सौ अनिल पाटील ठाणे, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, कैलास वाडकर (देणगीदार व पालखी संयोजक शिरवळ, पुणे), अतुल शिंदीकर (देणगीदार, ठाणे प.) शिवसेना संपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, कॉंग्रेसचे शितलताई म्हेत्रे, बाळासाहेब दाभेकर, आबा बालगुडे, आरतीताई लिंगायत, निरंजन दाभेकर, प्रवीण मोरे माथेरान आदि मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
नवीन उर्जा देणारे अन्नछत्र :
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र हे गेली ३६ वर्षे निरंतर जपले आहे. ३७ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास शुभेच्छा..! आजच्या गुरुपोर्णिमेच्या दिवशी ५ मजली निवासी इमारतीचे भूमिपूजन कार्य वटवृक्षासारखी विस्तारित असल्याची साक्ष देणारे आहे. प्रत्यक्ष उपस्थिती काही कारणाने येणे जमले नांही. परंतु या विधायक कार्याला माझ्या शुभेच्छा..! न्यासाकडून श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. न्यासाचे सामाजिक कार्य देखील उल्लेखनीय आहे. वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही बाब अत्यंत प्रशसनीय आहे. न्यासाच्या कामाच्या उल्लेख करायचा तर वेळ अत्यंत अपुरा पडेल. न्यासाच्या पदाधिकारी, सदस्य,सेवेकरी, कर्मचारी यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा ..! सदर कार्यक्रम प्रसंगी ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ ग्राफीच्या माध्यमातून भूमिपूजन कार्याला वरील शुभेच्छा दिल्या. -ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
याप्रसंगी बोलताना आमदार कल्याणशेट्टी यांनी म्हणाले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे राज्यातील एकमेव असे महाप्रसादालय आहे की, यथाशक्ती देणगीतून गेल्या ३७ वर्षापासून अविरत सुरु आहे. भक्तांना देणगीबाबत कोणतेही बंधन नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्मांची साथ देणारे मंडळ आहे. या महाप्रसादाने आत्मा तृप्त होतो व मोठे समाधान मिळते. मंडळाच्या वर्धापन दिनास शुभेच्छा व उत्तरोत्तर मंडळाचे प्रगती व्हावे ही श्रीचरणी प्रार्थना अशा शुभेच्छा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी अन्नछत्र मंडळास आजवर सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. पुढे देखील प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाची टीम प्रगतीची यशस्वी घोडदौड सुरूच ठेवली आहे. याचा मला आनंद आहे. असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याबरोबरच माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, राज्य अधिस्वीकृती समिती, महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष व मुंबईचे जेष्ठ पत्रकार यदुभाऊ जोशी यांनी देखील शुभेच्छा व्यक्त केल्या.
या विविध कार्यक्रमास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, भाऊ कापसे, विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, अप्पा हंचाटे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, डॉ.प्रसाद प्रधान, केदारनाथ बेंगळूर, संदीप फुगे-पाटील, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, मनोज निकम, अरविंद शिंदे, प्रविण देशमुख, दिलीप सिद्धे, किशोर सिद्धे, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, श्रीकांत झिपरे, रोहित खोबरे, वैभव मोरे, सौरभ मोरे, संजय गोंडाळ, राजाभाऊ नवले, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, रामचंद्रराव घाटगे, पिंटू दोडमनी, गणेश भोसले, रमेश हलसंगी, संतोष माने, पिंटू साठे, गोटू माने, अविनाश मडीखांबे, केदार माळशेट्टी, अभिजित लोकापुरे, रोहन शिर्के, योगेश पवार, अप्पा हंचाटे, राजकुमार झिंगाडे, राजेश भोसले, केदार तोडकर, गोविंद शिंदे, सागर याळवर, संजय गोंडाळ, केदार जाधव, अतिश शिंदे, सागर शिंदे, नागेश कलशेट्टी, रमेश केत, मैनुद्दीन कोरबु, शबाब शेख, दत्ता माने, बाळू पोळ, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, बाळासाहेब घाडगे, सिद्धेश्वर हत्तुरे, स्वामिनाथ बाबर, योगेश पवार, सागर शिंदे, पिंटू साठे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, राहुल इंडे, सुमित कल्याणी, विराज माणिकशेट्टी, पै.महेश कुलकर्णी, पै.मौला शेख, सरफराज शेख, शिवराज स्वामी, अतिश पवार व त्यांची टीम यांच्यासह आदीजण उपस्थितीत होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात असलेले यात्रीनिवास, यात्रीभुवन गेल्या दोन दिवसापासून हाऊसफुल्ल झालेले होते. मंडळाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाकरिता गर्दी झालेली होती. गेल्या ११ दिवसापासून श्री गुरु पौर्णिमा व ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, किर्तन या कार्यक्रमासह गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी महाप्रसाद भक्तांना वाटप होण्याकरिता नेटके नियोजन केलेले होते. विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वसंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी तर व आभार सचिव शामराव मोरे यांनी मानले.
शेकडो भक्तांनी केले रक्तदान :
गेल्या ११ दिवसापासून श्री गुरु पौर्णिमा व ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर येथील विविध रक्तपेढीने अन्नछत्र मंडळात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो स्वामी भक्तांनी रक्तदान केले.
चोख बंदोबस्त :
श्री गुरु पौर्णिमा व ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त मंदिर व न्यासाच्या परिसरात लावण्यात आला होता.
न्यासाचे नेटके नियोजन :
बाहेर गावामधून आलेल्या वाहनांची मैंदर्गी, बसलेगाव, व शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होत होती. हे लक्षात घेऊन न्यासाच्या मैंदर्गी रस्त्यावरील गेटने भाविकांना बाहेर जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आल्याने वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण आल्यामुळे वाहनांची गर्दी कमी झाली. न्यासाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. नेहमीच भक्तांना सुविधा देण्यामध्ये न्यास हे अव्वल असून भक्तांना कोणत्याच अडचणी येता कामा नये आशा उपाययोजना व दक्षता घेत असल्याने भक्तांना सुखकर पद्दतीने महाप्रसादाचा लाभ मिळाला.
लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ :
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दैनंदिन दोन्ही वेळेस मोफत महाप्रसादाची सोय, भक्तांच्या यथाशक्तीच्या देणगीवर सुरू आहे. दररोज २५ हजार तर सण, वार, उत्सव, दर गुरूवारी, संकष्टी चतुर्थी, एकादशी व गुरुपोर्णिमेच्या दिवशी १ लाखाहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री क्षेत्र अक्कलकोटचे नांव सातासमुद्रापार :
महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात, दिवदमन, उत्तराखंड, काश्मीर पंडित व दिल्ली याबरोबरच राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यासह विदेशातून लाखो भाविकांनी न्यासाचे ३७ वा. वर्धापनदिन व गुरुपोर्णिमेच्या निमित्त श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबरच अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेतेले.
एक दृष्टिक्षेप- नव्याने बांधण्यात येणाऱ्या नियोजित महप्रसादगृहाच्या वास्तूवर :
नियोजित महाप्रसाद गृहाची इमारत, भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सदर इमारतीचे बांधकाम करण्याची पुर्वतयारी झाली असुन, ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार आहे. या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे. सदर इमारतीस नगरपालिकेची रीतसर बांधकाम परवानगी घेतली आहे आणि अल्पावधीतच या इमारतीचे बांधकाम सुरू होत आहे.