मुंबई :वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरात दि.२१ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचे अधिवेशन मोठ्या उत्साहात झाले, यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याची टीका केली होती. यालाच आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘औरंगजेब फॅन क्लब भारताची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाही. या औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे आहेत. ते कसाबशी संबंधित असलेल्या लोकांसोबत एका ताटात जेवतात, ते पीएफआयला पाठिंबा देत असून औरंगाबादचे संभाजीनगर, असे नामकरण करण्याच्या विरोधात उभे आहेत आहे. हा फॅन क्लब महाराष्ट्र आणि भारत सुरक्षित करू शकत नाही. केवळ भाजपच सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करू शकतो.”
अंधारे म्हणाल्या आहेत की, ”अमित शहा यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळे उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्कीच स्पष्ट झाले. त्यातला पहिला भाग म्हणजे आजही अमित शहा यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही.”
अंधारे म्हणल्या, ”याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, ”ज्या पद्धतीची अत्यंत खालच्या पातळीची भाषा आज तुम्ही पुण्यामध्ये केली, त्यावरून तुम्ही हे सप्रमाण सिद्ध केले की, लोकसभेत तुमच्या पक्षाचे खासदार रमेश बिधुरी यांनी जी सवंग भाषा केली होती, त्याच्याही पेक्षा अधिक निम्नतम-स्तर अमित शहा तुम्ही आज पुण्यामध्ये येऊन गाठला आहे.”