ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बापरे : शेतकऱ्याने फिरविला कोथंबीरवर नांगर

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून अनेक ठिकाणी कोथंबीरीला सुरवातीला चांगला दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कोथंबीरीची लागवड केली होती. मात्र बाजारात अचनक आवक वाढल्याने कोथंबीरीचे दर घटले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अश्यात कोथंबीर शेतातून काढून विक्री करण्याऐवजी शेतकऱ्याने तिच्यावर शेतातच नांगर फिरवून टाकला.

नाशिकच्या येवला तालूक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कोथंबिरीचे पीक घेतले. सुरवातीला चांगला दर मिळालेला असतांना सध्या आवक वाढू लागली आणि दरात घसरण झाली. यामुळे राजापूर येथिल शेतकरी विठ्ठल वाघ यांनी एक एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कोथंबिरीला व्यापाऱ्याने सात हजार रुपयांचा दर मागितला. परंतु त्यांनी मागितलेला दर न मिळता कमी भाव मिळाला. हा दर परवडत नसल्याने हताश झालेल्या वाघ यांनी आपल्या एक एकर क्षेत्रातील कोथंबिरीचे पीक नांगरुन नष्ट केले.
कोथंबिर पिकवतांना हजारो रुपये खर्च झाले. मात्र ती कवडीमोल भावात विक्री होत असल्याने तोडणी, विक्रीला घेऊन जाण्याचा खर्च निघत नसल्याने अखेर विठठल वाघ यांनी आपल्या शेतातील एक एकर शेतातील कोथंबिरीवर नांगर फिरवला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!