---Advertisement---

प्रवासात इतरांशी वाद घालू नका !

By team
On: July 29, 2024 8:30 AM
Follow Us:
---Advertisement---

मेष
या राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. लोकांची तुमच्यावर मर्जी बसेल. मित्रांचा गोतावळा वाढेल. रिअल इस्टेट क्षेत्रातील लोकांना अधिक फायदा होणार आहे. संध्याकाळी घरातील एखाद्या व्यक्तीचं दुखणं बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही परेशान होण्याची शक्यता आहे. परंतु, रात्री सर्वकाही ठिक होईल. प्रवासाचा योग आहे. वाहने जपून चालवा.

वृषभ
आज तुमची सर्व अर्धवट कामे मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी शत्रू निर्माण होतील. ते लोक तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही अत्यंत हुशारीने या सर्वांचा बंदोबस्त कराल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला राहील. मुलाच्या विवाहाचा प्रश्न मार्गी लागेल. मुलीच्या करिअरकडे अधिक लक्ष द्या. लव्ह लाइफ अत्यंत चांगली असेल. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे.

मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचा ठरेल. तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते मिळतील. त्यामुळे तुमचा आजचा दिवस अत्यंत आनंदी जाईल. जीवनसाथीसाठी एखादी भेट वस्तू खरेदी कराल. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागणार आहे. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत चांगला जाणार आहे. नवा उद्योग काढण्याची योजना आखाल. तुमच्या खाण्यापिण्यावरही नियंत्रण ठेवा. संध्याकाळी धार्मिक कार्यात भाग घ्याल.

कर्क
आज तुमच्या एखाद्या कार्यात तुमचे बहीण भाऊ तुम्हाला साथ देणार नाही. त्यामुळे तुमच्या अडचणी वाढतात. तुम्ही थोडं गंभीरपणे घेतल्यास तुमची कामे मार्गी लागतील. आज तुमचे शत्रू डोकं वर काढतील. पण तुम्ही त्यांचे मनसुबे उधळून लावाल. तुम्ही अत्यंत भावूक व्यक्ती आहात. त्यामुळेच तुमचा गौरफायदा घेतला जातो. उद्योगात ज्या योजना आखलेल्या असतील त्याचा फायदा होईल. नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचा योग आहे. आज तुमच्या राशीत अचानक असं काही घडेल की तुम्हाला अचानक धनलाभ होईल.

सिंह
आज पुण्यदान करण्याचं काम कराल. धर्मकर्मासाठी पैसा खर्च कराल. तुमचा अडकेलला पैसा तुम्हाला मिळेल. सोनं खरेदी करण्याचा शक्यता आहे. नातेवाईकाचं घरी आगमन झाल्याने घरात आनंदी वातावरण राहील. संध्याकाळी मित्रांसोबत पार्टी कराल. चुकीच्या लोकांची संगत सोडण्याचा निर्णय घ्याल. व्यसनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीतील सहकाऱ्यांपासून सावध राहा. इतरांच्या वाढदिवसासाठी खर्च कराल.

कन्या
आजचा दिवस भलता चांगला जाईल. गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या शारीरिक कष्टाच्या कामातून मुक्ती मिळेल. तुमची प्रकृती चांगली राहील. आज संकटात असलेल्या एखाद्या मित्राला मदत कराल. त्यामुळे मनाला आनंद मिळेल. मुलांच्या भवितव्याशी संबंधित आनंदाची बातमी कानावर येईल. त्यामुळे तुमचा मानसिक तणाव दूर होईल. एका मोठ्या संकटातून आज तुम्ही मुक्त व्हाल. जीवनसाथीसोबत कुरबुरी सुरू असतील तर सामोपचाराने त्या सोडवाल. संध्याकाळी बुजुर्ग मंडळींशी संवाद साधाल.

तूळ
कुणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. काही लोक गोडबोलून तुमची फसवणूक करण्याची शक्यता आहे. आज तुमची अत्यंत प्रभावशाली लोकांशी भेट होणार आहे. व्यवसायात लाभ मिळवण्यासाठी नव्या योजना आखाव्या लागतील. नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्यांना आज मित्रांची मदत मिळेल. नोकरदार वर्गाची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करू इच्छिणाऱ्यांना आज ऑफर लेटर मिळण्याची शक्यता आहे. आज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. सिंगल लोकांना विवाहाचे प्रस्ताव होतील.

वृश्चिक
प्रेयसीसोबतचा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा ब्रेकअप होऊ शकतो. उतावळ्या स्वभावामुळे आज तुमचं धंद्यात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आज वाजवीपेक्षा अधिक खर्च होणार आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. आज तुमचा मान सन्मान वाढेल. आज शत्रू पक्षावर विजय मिळवाल. विद्यार्थ्यांनी आज सीनिअर्सचा सल्ला घ्यावा. शेजाऱ्याच्या नादाला लागू नका. फुकटची कटकट मागे लागेल.

धनु
आज संमिश्र असा दिवस राहील. कुटुंबात सुरू असलेल्या कटकटी दूर होतील. पण मानसिक तणाव कायम राहील. एखाद्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर विचार करूनच निर्णय घ्या. आजचा दिवस तसा बरा नाही. कर्ज चुकवता येत असेल तरच निर्णय घ्या. मामासोबत वाद होतील. जीभेवर नियंत्रण ठेवा. तोंडाचा पट्टा चालू ठेवल्याने नात्यामध्ये कटुता येण्याची शक्यता आहे.

मकर
आजचा दिवस अत्यंत चांगला जाणार आहे. तुम्हाला वाडवडिलांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्र किंवा सहकाऱ्यांना त्यांनी विचारल्यावरच सल्ला द्या. अतिशहाणपणा करायला जाल तर पस्तवाल. व्यापारात आज नवी रणनीती बनवण्याची गरज आहे. त्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. संध्याकाळी धार्मिक कार्यात भाग घ्याल. त्यामुळे मन प्रसन्न आणि शांत राहील.

कुंभ
बायको माहेरी गेलेली असेल तर परत घरी येईल. तुमच्या स्वभावाला आवर घाला, नाही तर एक दिवस मोठं नुकसान होईल. ज्येष्ठांचा मान ठेवा. आमदनी वाढवण्यावर भर द्या. जीवनसाथीच्या सल्ल्यामुळे तुम्हाला व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या सदस्याचं आजारपण उद्भवेल. त्यामुळे तुम्हाला मोठी धावपळ करावी लागू शकते. संध्याकाळी शेजाऱ्याच्या घरात गप्पांचा फड रंगेल.

मीन
शेजाऱ्यांपासून सावध राहा. गोडबोलून तुमचं नुकसान करण्याची शक्यता आहे. व्यापारात नवीन डील फायनल होऊ शकते. एखाद्या शुभकार्याबाबत घरच्यांशी चर्चा होईल. घरातील एखादा सदस्य कामानिमित्ताने दूर देशी जाण्याची शक्यता आहे. जुन प्रेमप्रकरण पुन्हा सुरू होईल. मात्र, यावेळी ताकही फुंकून प्या. प्रवासात इतरांशी वाद घालू नका. तुम्ही प्रवास करत आहात, ऑफिसमध्ये नाहीत याचं भान ठेवा.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!