ध्यास विश्वसार्ह बातमीचा

 इनर व्हिल क्लब ऑफ अक्कलकोटची स्थापना ; अध्यक्षपदी रूपाली शहा तर सचिवपदी सलोनी शहा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

येथे इनरव्हील क्लब ऑफ अक्कलकोटची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी संस्कार प्री स्कूलच्या रुपाली शहा,उपाध्यक्ष म्ह्णून सुचित्रा साखरे तर
सचिवपदी सलोनी शहा यांची निवड करण्यात आली आहे. या नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली. इनर व्हिल हा एक इंटरनॅशनल वुमन ऑर्गनायझेशन ग्रुप आहे.जे गेले शंभर वर्ष सातत्याने सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे.या ऑर्गनायझेशनचा एकमेव उद्देश मैत्री आणि समाजकार्य आहे. या क्लब मध्ये आजपर्यंत जवळजवळ जगभरातून १०२ देश समाविष्ट आहेत आणि एक लाखापेक्षा जास्त महिला या संस्थेशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि अविरतपणे समाजकार्यासाठी काम करत आहे.ही ऑर्गनायझेशन संस्था १० जानेवारी १९६७ मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि हा दिवस आज इंटरनॅशनल इनरव्हील डे म्हणून साजरा केला जातो .
या क्लबची संकल्पना या क्लबच्या नूतन अध्यक्षा रूपाली शहा यांच्याकडून मांडण्यात आली आणि या क्लब साठी इनरव्हील क्लब ऑफ जयसिंगपूरच्या सदस्या डीएएसओ वसुंधरा कोले , डीसी डॉ.शोभना पालेकर , आणि डीइएसओ आशाताई देशपांडे यांनी सहकार्य केले.

या क्लबच्या खजिनदारपदी स्वाती हत्ते,आयएसओ रेखा माशाळे,एडिटर चंचल जाजू ,सीसी डॉ.पवित्रा मलगोंडातसेच प्रिती रणसुभे ,डॉ.स्नेहा वेळापूरकर , कला पटेल,कीर्ती हिंडोळे, शीला माशाळे , आरती सांगळे, मेघा हिंडोळे, प्रतिभा हिंडोळे , सुनंदा पत्रिके ,संजोता पाटील ,रेखा पाटील, संध्या हिप्परगी ,मनीषा धोंगडे ,रश्मी सुतार , वर्षा हिप्परगी ,सोनल जाजू ,श्रुती वाली, मीनाक्षी गंदगे, स्वाती शहा इत्यादी सदस्य असून त्यांचा अक्कलकोटच्या सामाजिक कार्यामध्ये हातभार लावण्याचा मानस आहे.
या इनर व्हील क्लब अक्कलकोट च्या फाउंडेशनचे उद्देश शैक्षणिक सामाजिक वंचित लोकांसाठी कार्य करण्याचे आहे तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता शैक्षणिक कार्यात हातभार लावण्याचा मानस आहे तसेच महिलांमध्ये व मुलींमध्ये आत्मविश्वास व स्वावलंबन निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न असणार आहे व सर्व स्तरांतील महिलांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी व मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यरत असणार आहे.विशेषतः महिलांना आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे व आरोग्याची काळजी घेणे याकरिता मार्गदर्शनपर कार्यशाळा ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल,असे नूतन अध्यक्षा रुपाली शहा यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!