---Advertisement---

आठवलेंची वादात उडी : आपणच होणार मुख्यमंत्री !

By team
On: August 1, 2024 4:54 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकारण रंगेल असतांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना ठोकून काढा असा संदेश दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हात उगारला तर हात ठेवायचा नाही असे सांगितले आहे. यादरम्यान रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी मात्र या वादात उडी घेत हा वाद सुटला नाही तर आपणच मुख्यमंत्री होऊ असे विधान केले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रामदास आठवले पुण्यात अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना पुढचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच असेन असे म्हटले. यानंतर एकच हास्यकल्लोळ झाला. दरम्यान यावेळी त्यांनी दोन्ही नेत्यांनी मनातून चीड काढून टाकावी. दोघांचे चांगले संबंध होते, पुन्हा त्यांची मैत्री व्हावी असे मला वाटत आहे असे आवाहनही केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!