---Advertisement---

डबल डेकर बस व कारचा भीषण अपघात : ७ ठार तर ४० गंभीर

By team
On: August 4, 2024 11:43 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील अनेक राज्यात अपघाताची मालिका सुरु असतांना उत्तर प्रदेशातील इटावा येथील आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. लखनौहून दिल्लीला जाणारी डबल डेकर बस कारला धडकल्यानंतर नियंत्रणाबाहेर गेली आणि एक्स्प्रेस वेच्या खाली खड्ड्यात पडली. या अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जखमी झाले आहेत.

इटावा एसएसपी संजय कुमार वर्मा यांनी अपघाताची माहिती दिली. रायबरेलीहून दिल्लीला जाणारी डबल डेकर बस रात्री साडेबारा वाजता एका कारला धडकली. बसमध्ये ६० लोक होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे २०-२५ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचाही मृत्यू झाला. एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!