---Advertisement---

कंपनीत अमोनिया वायूची गळती : कामगारांची प्रकृती चिंताजनक

By team
On: August 8, 2024 3:40 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे शहरातील एका कंपनीत फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया वायूची गळती सुरु झाली. यामुळे कारखान्यातील काम करणाऱ्या 17 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 17 जणांमध्ये अनेक महिला असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला आयसीयूमध्ये ठेवले आहे. यवतजवळील भाडगाव येथे बुधवारी सकाळी रेडी-टू-ईट फूड प्रोसेसिंग यूनिटमध्ये ही घटना घडली.

रेडी-टू-ईट खाद्य पदार्थ बनवणाऱ्या कंपनीत अमोनिया गॅसचा वापर केला जातो. त्यासाठी त्या ठिकाणी 18 डिग्री सेल्सियस तापमान ठेवले जाते. त्या कारखान्यात घटना घडली तेव्हा 25 जण काम करत होते. त्यातील 17 जण अमोनिया गॅसची गळती होणाऱ्या भागाच्या जवळ होते. यामुळे सर्वांना त्रास होऊ लालगा. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांनी सांगितली.

कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बैचनी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्वरीत कंपनीत तपासणी करण्यात आली. त्यावेळी अमोनिया वायूची गळती सुरु असल्याचे लक्षात आले. त्या झाल्यानंतर मुख्य रेग्यूलेटर त्वरीत बंद करण्यात आले. त्यामुळे मोठा अपघात टळला. अन्यथा दुर्घटना घडली असती. त्यामुळे मोठा धोका टळला. अमोनियाचा त्रास झालेल्या 17 पैकी 16 कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु आयसीयूमध्ये दाखल असलेल्या महिलेवर उपचार सुरु आहे. तिची प्रकृतीही धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!