ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक : दोन जवान शहीद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

१५ ऑगस्ट येण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागनंतर, रविवारी 11 ऑगस्ट किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार बटम ब्रिजवर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज सकाळी किश्तवाड जिल्ह्यातील जंगलात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. शोधमोहिमेदरम्यान दोन्ही बाजूंनी काही वेळ गोळीबार झाला.

नौनट्टा, नागेनी पायस आणि आसपासच्या भागात लष्कर, निमलष्करी दल आणि पोलीस कारवाई करत आहेत. या भागात अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.एक दिवस आधी शनिवारी (१० ऑगस्ट) अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हवालदार दीपक कुमार यादव आणि लान्स नाईक प्रवीण शर्मा शहीद झाले होते. 3 सैनिक आणि 2 नागरिक जखमी झाले. अनंतनागमध्येही सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

दहशतवादी डोडा येथून अनंतनाग परिसरात घुसल्याचे समजते. जिल्ह्यातील कोकरनाग शहरात 10,000 फूट उंचीवर ही कारवाई सुरू आहे. येथे दाट झाडी असून मोठे दगडही आहेत. येथे दहशतवादी लपले आहेत.दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!