---Advertisement---

क्रियाला – प्रतिक्रिया मिळणारच ; मनसे नेते देशपांडेंचा पुन्हा इशारा

By team
On: August 11, 2024 10:32 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात नुकतेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम असतांना या कार्यक्रमात जात असतांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर बांगड्या, नारळ व शेण फेकल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तर यावर आज मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संदीप देशपांडे म्हणाले कि, तुम्ही शिवसैनिक तर आम्हीही महाराष्ट्रसैनिक आहोत. तुमच्याकडून क्रिया घडली तर त्याला प्रतिक्रिया मिळणारच असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मराठा आंदोलनाच्या आडून राज ठाकरेंवर झालेले हल्ले मनसैनिक खपवून घेणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. ठाण्यात शनिवारी घडलेल्या घटनेनंतर त्यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी संदीप देशपांडे यांनी या हल्ल्याचे एक प्रकारे समर्थनच केले आहे. क्रियेची ही प्रतिक्रिया होती असे ते म्हणाले. ”कालची घटना ही क्रियेला प्रतिक्रिया होती. क्रिया झाली की प्रतिक्रिया दिली जाणार. एका ठिकाणी क्रिया करून सारवासारव करायची जी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आमचे ते कार्यकर्ते असले तरी आमची भूमिका नाही असे ते म्हणाले. त्यांना न विचारता त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी हल्ला केला का? मराठा आंदोलनाच्या आडून राज ठाकरेंवर केलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. पुन्हा जर क्रिया झाली तर प्रतिक्रिया होणारच”, असे संदीप देशपांडे म्हणाले.

तसेच तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार असतील तर आमच्याकडे पण आहेत असे देशपांडे म्हणाले. ”एखादी गोष्ट सुरूवात करताना पुढे काय परिणाम होईल याचा विचार करायचा असतो. दुसऱ्याने काही केल्यानंतर मग शहाणपणा शिकवायला जायचे नसते. तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही मनसैनिक आहोत. तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार असतील तर आमच्याकडेही बाळासाहेबांचे विचार आहेत. तुम्ही आरे केले तर आम्ही कारे करणारच”,असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!