---Advertisement---

मोठी बातमी : महायुतीमध्ये जागा वाटपाचे सर्व अधिकारी फडणवीसांना

By team
On: August 12, 2024 4:17 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून महायुतीमध्ये देखील जागा वाटपाच्या बैठकी सुरु झाल्या असून महाराष्ट्र राज्य भाजपमधील देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाचा कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भाजपचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच आगामी निवडणुकीचे किंग मेकर असतील.

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभेचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी लोक विधानसभा निवडणुकीसंदर्भात तयारीचा आढावा तसेच नियोजनाबाबत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात कोणत्या उमेदवाराला कोणत्या मतदारसंघातून तिकीट द्यायचे, याचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. महायुतीमध्ये जागावाटपात देखील महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. या संदर्भातले सर्वाधिकार हे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

महायुतीमध्ये सर्व पक्षांचे नेतृत्व आणि जागावाटप करण्याचा निर्णय झाला आहे. आमच्या सर्व मित्र पक्षांसोबत बैठक होणारच आहेत. या बैठकीमध्ये जागा वाटपाचा निर्णय आणि पुढील भविष्यामध्ये उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष घेणार असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले आहे. आगामी काळात विधानसभेत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!