अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट शहर व तालुक्यात खेळाचा व्यापक विस्तार करून अधिक गुणवान खेळाडू आणि खेळाच्या माध्यमातून संस्कार,सशक्त,सक्षम व चारित्र्यवान व्यक्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रव्यापी संघटन असलेल्या क्रीडाभारती संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी क्रीडाभारतीचे जिल्हापदाधिकारी राजेंद्र कळमणकर,ज्ञानेश्वर म्याकल,डॉ.विलास हरपाळे,अरुण उपाध्ये यांनी अमोलराजे भोसले यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केले.
यावेळी प्रास्ताविक क्रीडाभारती चे तालुका संयोजक अभिजित लोके सर यांनी केले.तर स्वागत तालुकामंत्री प्रकाश सोनटक्के यांनी केले.या प्रसंगी मार्गदर्शक व निवृत्त मुख्याध्यापिका कु.उषाताई हंचाटे,क्रीडाशिक्षक परमेश्वर व्हसुरे ,कल्याणी लकशेट्टी,बाबुराव पवार,दत्तात्रय बिराजदार,सर्जेराव माशाळ,शंभूराजे गाटे आदी उपस्थित होते.
या वेळी अक्कलकोट तालुका क्रीडाभारती पदाधिकारी मंडळ व कार्यकारिणी सदस्य जाहीर करण्यात आले.ते पुढील प्रमाणे अध्यक्ष अमोलराजे भोसले,उपाध्यक्ष महिबुब शेख,महिला उपाध्यक्ष उषाताई हंचाटे,तालुकामंत्री प्रकाश सोनटक्के,सहमंत्री नागराज कलबुर्गी,परमेश्वर व्हसुरे,कल्याणी लकशेट्टी,खजिनदार अमोल कोकाटे,क्रीडांगण प्रमुख अविनाश राठोड,उपप्रमख दत्तात्रय हिल्ली,इकबाल टिनवाला,संयोजक अभिजित लोके आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून दत्तात्रय बिराजदार,अरविंद शिंदे,उमेश नेवाळे,बाबुराव पवार,दयानंद उटगे,अमर पराड,शंभू गाटे,आनंद पाटील,सिद्धेश्वर घुगरे,कुमार जाधव,दयानंद दणुरे,प्रशांत राचेटी यांची निवड झाली.
शेवटी राजेंद्र कळमनकर यांनी आभार मानले.






