मुंबई : राज्यावर एकीकडे करोना संकट असल्याने आर्थिक समस्यांचा डोंगर उभा असताना मंत्र्यांची दालनं आणि बंगल्यांच्या डागडुजीसाठी ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं वृत्त आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं शासकीय निवासस्थान वर्षासह इतर अनेक बंगल्यांचा समावेश आहे. सामाजित न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचाही यात उल्लेख आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगत फेटाळलं आहे. तीन कोटी सोडा मी एक रुपयाही खर्च केलेला नाही असं त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे. काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे. त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे.मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही.
काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे.त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे.मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 14, 2020
दरम्यान, राज्यात नवे सरकार आल्यानंतर त्या सरकारमधील मंत्री आपापल्या सोयीनुसार व आवडीनुसार शासकीय बंगल्यांमध्ये व कार्यालयांमध्ये बदल करत असतात. त्यावर खर्चही बराच होतो. मात्र, यावेळी करोनाचे संकट असल्यानं राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. विकासकामांसाठी पुरेसा निधी नाही. मात्र, मंत्र्यांचे बंगले व दालनांची कामे ९० टक्के पूर्ण झाली असून त्यांची देयकेही दिली जात असल्याचं वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे.