---Advertisement---

सरकारने मोक्याच्या जागा अदानींच्या घशात घातल्या ; ठाकरेंचा हल्लाबोल

By team
On: August 17, 2024 3:21 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई  : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आता राज्यातील ठाकरे गट आता सत्ताधारीवर आरोप प्रत्यारोप सुरु केले असून नुकतेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

ठाकरे म्हणाले कि, आताच्या सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मराठी माणसाला बेकार करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सरकारने मोक्याच्या जागा अदानींच्या घशात घातल्या आहेत. आता आरसीएफ देखील अदानींच्या घशात घालतील की काय अशी स्थिती आहे असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ”आज देखील आपल्यावरील संकट गेलेले नाही. रोज नवीन संकट समोर उभे राहत आहे. कारण आताच्या सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मराठी माणसाला हद्दपार करायचे ही सरकारने घेतलेली सुपारी आहे. मात्र आता केवळ दोन ते तीन महिन्यांचा प्रश्न आहे. सरकारची ही अत्यंत घाणेरडी, व्यापारी वृत्ती आहे. त्यामुळे 1966 सालचा काळ पुन्हा उभा करण्याचा विचार आम्ही केला तर त्यात चुकीचे काय आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, कोरोनाची लस तयार केली त्यावर मोदींचा फोटो होता. मात्र खतांच्या गोणीवर देखील मोदींचा फोटो असतो. मग ही खते मोदींनी तयार केली का? असे उद्धव ठाकरे म्हणाले. मोक्क्याच्या जागा अदानींच्या घशात घातल्या आहेत. आता आरसीएफ देखील अदानींच्या घशात घालतील की काय अशी स्थिती आहे. मात्र शिवसेना असे होऊ देणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार पाडले. गद्दारांना पन्नास खोके दिले आणि लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये दिले जात आहेत”, असे ठाकरे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!