---Advertisement---

उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री !

By team
On: August 18, 2024 10:31 AM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

महाविकास आघाडीमध्ये सध्या भावी मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच दोन दिवसांपुर्वी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करा मग पाठिंबा देतो. याबरोबरच शनिवारी(दि.17) शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असतील असा पुनरुच्चार केला आहे. शनिवारी (दि.17) विदर्भामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

2019 मध्येही उद्धव ठाकरे यांना सर्व संमतीने मुख्यमंत्री करण्यात आले होते. आता 2024 ची वेळ आहे. जागावाटप सुसंवादातून होईल आणि मविआचे सरकार येईल. मला विश्वास नव्हे खात्री आहे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, जनतेच्या मनात तेच मुख्यमंत्री असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी केले.

महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून गेले काही दिवस रस्सीखेच सुरू आहे. ज्या पक्षाच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेसने व्यक्त केली. यावर मला हे सूत्र मान्य नाही असे स्पष्ट करीत मुंबईत झालेल्या मविआच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे करावा मी येथेच समर्थन देतो अशी भूमिका व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या आणि स्वतः शरद पवार इकडे विदर्भात असताना राऊत यांनी आता पुन्हा असे मत व्यक्त केल्याने आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!