---Advertisement---

राज्यात आणखी ५ दिवस चालणार पाऊस !

By team
On: August 20, 2024 9:55 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम ते जोरदार पाऊस सुरु असून येत्या २५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. सध्या भारत महासागर विषुववृत्तीय परिक्षेत्रात असलेली एमजेओची उपस्थिती आणि कमाल तापमानात वाढ, यामुळे राज्यात आठवडाभर विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. विदर्भात जोरदार तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाचा अंदाज आहे.

संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील पाचोड, पैठण आणि सिल्लोड या भागात दमदार पाऊस झाला. तर जालना आणि परभणी जिल्ह्यातही दुपारी २ ते ३ या वेळेत मुसळधार पावसाची नोंद झाली. जालन्यात बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, घनसावंगी या भागात पाऊस झाला. तर हिंगोली जिल्ह्यात साखरा (ता.सेनगाव) येथे शेतात काम करत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला.

२० ऑगस्ट : जोरदार ते अतिजोरदार – नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर. २१ ऑगस्ट : जोरदार ते अतिजोरदार – मुंबई, ठाणे, पालघर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अकोला, अमरावती. २२ व २३ऑगस्ट : जोरदार ते अतिजोरदार – नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई, विदर्भ २४ ऑगस्ट : जोरदार ते अतिजोरदार – , धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार संभाजीनगर, जालना, परभणी, मुंबई, विदर्भ. २५ ऑगस्ट : जोरदार – नाशिक, नगर, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, धुळे, जळगाव, नंदुरबार, रायगड, ठाणे. मराठवाड्यात मात्र हलका.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!