---Advertisement---

कै. शिवाजी बंडगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

By team
On: August 20, 2024 5:03 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सुनील दादा बंडगर यांचे पिताश्री कै. शिवाजी गंगाराम बंडगर यांच्या ४ थ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी त्यांना पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

साहिल पॅलेस येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील दादा बंडगर, भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष नन्नू भाई कोरबू, रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, नगरसेवक नागराज कुंभार, रासपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर,पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे,रासपचे अक्कलकोट तालुका युवक आघाडी अध्यक्ष दाजी कोळेकर, शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकोट शहर अध्यक्ष योगेश पवार यांनी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी धोंडीबा कुंभार, भरत माशाळे, मधुसुदन माशाळे, सचिन माळी, सुरेश गायकवाड, सागर माळी, इरफान कोरबू, मुकेश सक्सेना, विठोबा कोळेकर, श्रीशैल दिवटे, रवी बजंञी, संतोष फुलारे, अवधूत फुलारे, विठ्ठल कत्ते, स्वामीनाथ गुड्डे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!