---Advertisement---

खासगीकरण ही मोदी सरकारची गॅरंटी ; राहुल गांधींचे टीकास्त्र

By team
On: August 20, 2024 5:11 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सरकारी नोकऱ्यांसाठी थेट पद्धतीने नियुक्ती (लॅटरल एंट्री) करण्याच्या निर्णयावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ‘हे देशविरोधी पाऊल असून, यातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचे आरक्षण हिसकावून घेतले जात आहे,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ‘आयएएसचे खासगीकरण ही मोदी सरकारची आरक्षण संपवण्याची गॅरंटी आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारी सेवकांची भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून करून राज्यघटनेवर हल्ला करीत आहेत,’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली. केंद्र सरकारमधील विविध मंत्रालयांतील सहसचिव, संचालक आणि उपसंचालक आदी पदांवर 45 तज्ज्ञांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे. समान्यत: अशी पदे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस आणि गट अ सेवांतून भरली जातात. ‘केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांतील पदे लॅटरल एंट्रीद्वारे भरून एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण खुलेपणाने हिसकावून घेतले जात आहे,’ अशी टीका राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!