---Advertisement---

छत्रपती संभाजीनगरात हिंदू समाज उतरला रस्त्यावर !

By team
On: August 21, 2024 3:54 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन दिवसांपूर्वी तरुणाच्या जाचाला कंटाळून एका 16 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात ही तरुणी राहत होती. याच निषेधार्थ आज हर्सुल टी पॉइंट येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पूजाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोनकर्ते करत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज रस्त्यावर उतरला आहे.

तू माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या भावाला जिवे मारून टाकीन, अशा मेकॅनिकच्या धमक्यांना व त्रासाला कंटाळून पूजा पवार(16) हिने 18 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यात 7 जणांवर गुन्हा नोंदवला, पण केवळ दोघांनाच अटक केली आहे. मोकाट असलेल्या उर्वरित आरोपींनी आता पूजाच्या कुटुंबीयांना धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यांनी तिच्या घरासमोर येऊन ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ असे म्हणत चाकू, तलवार दाखवून धमकी दिली. या प्रकारामुळे पवार कुटुंबीय दहशतीखाली आहेत. दहावीत 96 टक्के गुण घेऊन उतीर्ण झालेल्या पूजा पवार या 16 वर्षांच्या मुलीला गावातील कासीम यासीन पठाण हा गॅरेज मेकॅनिक तिला धमक्या देत होता. गेल्या 8 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अशा धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या पूजाने आत्महत्या केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!