---Advertisement---

ठाकरे गट व भाजप कार्यकर्त्यामध्ये राडा : पोलिसांनी केला लाठीचार्ज

By team
On: August 26, 2024 10:03 AM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतांना सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप रंगत असतांना अनेक नेते राज्याच्या दौऱ्यावर आहे. यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील दौऱ्यावर निघाले असतांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा राडा झाल्याचे समजते आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धाव घेतल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांना अखेर लाठीचार्ज देखील करावा लागला. या सर्व प्रकरणामुळे संभाजीनगर मधील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर हा सर्व प्रकार घडला. आदित्य ठाकरे यांनी दिशा शालियान यांच्या प्रकरणातवर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने हा सर्व प्रकार घडला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!