---Advertisement---

अजित पवार संतापले : अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी

By team
On: August 26, 2024 5:46 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील विरोधक सध्या सत्ताधाऱ्यावर लक्ष ठेवून असतांना सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. हा कचरा इथे मला उचलण्यासाठी ठेवला आहे का? इथे तुम्हाला झ* मारण्यासाठी ठेवले आहे का? असे ते यावेळी संतापाच्या सुरात बोलताना म्हणाले.
अजित पवार आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेकदा कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच अनेकांना ताकीदही दिली. त्यांच्या या स्वभावाची सोमवारी पुन्हा एकदा प्रचिती आली. अजित पवार सोमवारी येथे जीएसटी भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आले होते. उद्घाटनानंतर त्यांनी इमारतीची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी केलेले थातुरमातूर काम त्यांच्या नजरेस पडले.

अजित पवार यांनी इमारतीच्या उद्घाटनासाठी गाडीतून खाली उतरले. त्यानंतर इमारतीच्या पहिल्याच पायरीवर सिमेंट तसेच पडल्याचे त्यांना दिसले. हे पाहून अजित पवार यांच्या संतापाचा पारा चढला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला हे असे का झाले? असा प्रश्न केला. त्यावर त्या अधिकाऱ्याने हे सिमेंट काढायचे राहिले, असे प्रत्युत्तर दिले. अधिकाऱ्याच्या या उत्तराने अजित पवार यांचे समाधान झाले नाही. ते लगेच म्हणाले, हे मला काढायला ठेवले आहे का? मी बारीक सारीक पाहतो हे तुम्हाला माहिती आहे ना? मग हे कशाला झ* मारायला ठेवले आहे का? अजित पवार यांचे हे रौद्ररुप पाहून सदर अधिकाऱ्याची पाचावर धारणच बसली.

अजित पवार यांचा राग एवढ्यावरच शांत झाला नाही. ते इमारतीच्या आतील बाजूला केले. तिथे एका मोकळ्या जागेत ड्रेनेजचे चेंबर रस्त्याच्या मध्येच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते पाहून अजित पवार पुन्हा अधिकाऱ्यांवर चिडले. तुमची अशी अशी छा चू गिरी चालणार नाही, असे ते रागाने म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!