---Advertisement---

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक : तीन दहशतवादी ठार

By team
On: August 29, 2024 10:21 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात गेल्या काही महिन्यापासून दहशतवादी कारवाई सुरु असतांना नुकतेच उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. माछिल सेक्टरमध्ये सुरू असलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले, तर तंगधार सेक्टरमध्ये एक दहशतवादी मारला गेला. दोन्ही कारवाया अजूनही सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. बुधवारी रात्री उशिरा ५७ राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी सतर्क असताना माछिल सेक्टरमध्ये तीन ते चार दहशतवाद्यांचा एक गट पाहिला, त्यानंतर दोन्हीकडून जोरदार गोळीबार झाला.

राजौरी जिल्ह्यातील लाठी गावातही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. राजौरीमध्ये २ ते ३ दहशतवादी लपले असून सुरक्षा दलांनी त्यांना घेरले आहे. परिसरात शोधमोहीम सुरू आहे. कुपवाडा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी तंगधार सेक्टरमध्ये पहिली चकमक सुरू झाली, जिथे सुरुवातीच्या गोळीबारानंतर मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन करण्यात आले. कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्येही सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून, कारवाई अजूनही सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!