ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मैंदर्गी कन्नड शाळेने घडविली पालकांची सहल !

पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक सरसावले

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील मैंदर्गी कन्नड मुली शाळा येथील पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीसह जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओढा वाढण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविला आहे.शाळेतील मुलींच्या पालकांना आता श्रावण महिन्यात श्रीशैलम, मंत्रालय ,महानंदी या देवी देवतांचे दर्शन मोफत शाळेच्यावतीने करण्यात आले  आहे. त्यामुळे या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

या शाळेने आतापर्यंत वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत.परिसर भेट, साखर कारखाना भेट, वनभोजन, पालकांच्या सहकार्याने वृक्षारोपण ,आषाढी एकादशी दिंडी, प्रभात फेरीमध्ये घोडा गाडी, ग्रंथ दिंडी या सर्व कार्यक्रमात पालकांचा सहभाग घेऊन कार्यक्रम होत असतात.विशेष म्हणजे शाळेकडून दोन वेळा विमान प्रवास घडविण्यात आला आहे. गोरगरिबांच्या मुलींना शेतकऱ्यांच्या मुलींना विमान प्रवास घडविणे हे काम सोपे काम नाही. आता पुन्हा यावर्षी शाळेतील मुलींच्या पालकांना श्रावण महिन्यात श्रीशैलम,
मंत्रालय, महानंदी या देवी देवतांचे दर्शन मोफत शाळेच्यावतीने करण्यात आले आहे.

या प्रवासात पालक बहुसंख्येने सहभागी  झाले होते.हे सर्व शाळाकडून करण्याचा उद्देश म्हणजे फक्त शाळेची गुणवत्ता,विद्यार्थ्यांची गुणवत्ता व पट आणि उपस्थिती वाढवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पालकांचा देवदर्शनाचा उपक्रम घडविला आहे. या देवदर्शन कार्यक्रमात सहभागी झालेले पालक आनंदी व उत्साही होते.चार दिवसांची देवदर्शनाची सहल जिल्हा परिषद कन्नड मुली शाळेचेवतीने मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर गोब्बुर व सर्व सदस्यांच्या नियोजनामुळे घडली.या उपक्रमाबद्दल पालकांनी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचे आभार मानले आहे.यापुढे शाळेला कुठल्याही प्रकारची गरज पडली तर आम्ही सामूहिक रीतीने सहकार्य करणार असल्याची ग्वाही पालकांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!