---Advertisement---

जरांगे पाटलांनी महायुती सरकारविरोधात दंड थोपटले ; २९ पासून पुन्हा उपोषण !

By team
On: August 29, 2024 4:40 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येत असतांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महायुती सरकारविरोधात दंड थोपटले. यावेळी त्यांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवण्याचाही निर्धार व्यक्त केला. सरकारने 28 सप्टेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर मी 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसेन. ही आरपारची लढाई आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची म्हणजे जिरवायचीच, असे ते म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गुरुवारी 1 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने झालेल्या एका छोटेखानी बैठकीत मनोज जरांगे यांनी गुरुवारी दुपारी अचानक मराठा आरक्षणासाठी 29 सप्टेंबरपासून उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. आपल्याला काही झाले तरी समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. एक मेल्याने काही फरक पडत नाही. काळजी करू नका. माझे एक कुटुंब उघडे पडले तरी चालेल, पण समाजाचे लाखो कुटुंब मोठे झाले पाहिजेत. आपले उपोषण 29 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होईल.

आपल्याला मागे हटून चालणार नाही. आपल्याला या सरकारला वठणीवर आणावेच लागेल. कारण हे सरकार निवडणुकांना घाबरत नाही आणि रस्त्यावरच्या आंदोलनालाही भीत नाही. आपण सरकारला 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देऊ. तोपर्यंत सरकारने आरक्षण दिले तर ठीक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज येथे आंतरवाली सराटीत येऊन उपोषणाला बसेल, असे मनोज जरांगे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!