मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पालघरमध्ये आज ७६ हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यामध्ये वाढवण बंदर प्रकल्पाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी आणि भूमिपूजन करण्यात आले.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि.३० रोजी माफी मागितली. शिवराय आमचे आराध्य दैवत आहेत, आम्ही त्यांच्या चरणी डोके ठेऊन मी माफी मागतो, त्याचबरोबर जे शिवरायांना आराध्य दैवत मानतात, त्या शिवभक्तांचीही माफी मागतो, अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज (दि.३०) वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी संबोधित करताना आपल्या भाषणाची मराठीतून सुरूवात केली.
ते पुढे म्हणाले की, जे झाले ते अतिशय वेदनादायी आहे. पश्चाताप न होणाऱ्या मध्ये आम्ही नाही. आमच्या वरील संस्कार वेगळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी फक्त एक नाव नाही. तर शिवराय आमचे आराध्य दैवत आहेत. मी शिवरायांच्या चरणी माथा ठेऊन माफी मागतो. तसेच तमाम शिवप्रेमींचीही माफी मागतो.