---Advertisement---

मोठी बातमी : शरद पवार गटाचे नेते आले अडचणीत ; न्यायालयाने बजावली नोटीस

By team
On: September 3, 2024 4:43 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे आता एका प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली आहे. आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तीन एफआयआर एकत्र करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मनुस्मृतीमधील श्लोकाचा समावेश प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमात करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करताना आव्हाड यांनी हे कृत्य केले होते.

त्यानंतर आमदार आव्हाड यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलने झाली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या 153, 153A, 295, 188 नुसार 3 वेगवेगळ्या एफआयआरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 2 गुन्हे हे रायगड जिल्ह्यातील महाड पोलिस स्टेशनमध्ये आणि एक पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. या प्रकरणांना एकत्र करण्याची मागणी आव्हाड यांच्या वतीने करण्यात आली होती.

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे संतप्त झालेले शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली होती. मात्र, हे करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असलेले पोस्टरही फाडले होते. त्यावरून त्यांच्याविरुद्ध शिंदेसेनेने नाशिक, भाजपने पुण्यात येथे निदर्शने केली होती. आव्हाडांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी, अशी मागणीही अजित पवार गटाने केली होती. तर आव्हाडांनीही अनवधानाने फोटो फाडला गेला, असे सांगत माफी मागितली होती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या होत्या. अनेक पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवला. विरोधकांनी राज्य सरकारविरोधात टीकेची झोड उठवली. त्याच साठी आव्हाड यांनी 28 मे रोजी महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले. 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. आव्हाड यांनी त्याची पुनरावृत्ती करत हे आंदोलन केले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!