ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्धव ठाकरेंची मागणी शरद पवारांनी ठोकरली !

कोल्हापूर : वृत्तसंस्था

राज्यातील महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून मतभेद असतांना नेहमीच दिसून येत असतांना पुन्हा एकदा आता शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी थोकारली आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अद्याप विचार करण्याचे अजिबात कारण नाही. यापूर्वी अनेक वेळा असे घडले आहे की, नेतृत्व कोणी करायचे याबाबतचा निर्णय हा निवडणुका झाल्यानंतर संख्येनुसार घ्यायचा असतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. आज कशाचा काही पत्ता नाही. बहुमत मिळेल असे वातावरण आहे यात शंका नाही. मात्र, तरी देखील त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीने निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, आधी काँग्रेस आणि आता शरद पवार यांनी देखील त्यांची ही मागणी ठोकारली आहे. त्यासाठी पवारांनी 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीचे देखील उदाहरण दिले. आणीबाणी नंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीत देखील कोणालाही पुढे केलेले नव्हते. आणीबाणीला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे जयप्रकाश नारायणण यांनी म्हटले होते. निवडणूक झाल्यानंतर मुरारजी देसाई यांचे नाव पुढे आले. तोपर्यंत त्यांच्या नावाची कोणतीच चर्चा नव्हती. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून तिन्ही पक्ष राज्याला एक स्थिर सरकार देऊ, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. ज्यांचे संख्याबळ जास्त, त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे देखील त्यांनी सांगितले.

प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन आघाडी स्थापन करून निवडणुकीला सामोरे जात आहे. निवडणुकीनंतर भूमिका मांडून मुख्यमंत्री आमच्याच विचारांचा असला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मग तो काँग्रेसचा करा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा करा, किंवा कोणालाही करा. प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. संघ जर भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, असे म्हणत असेल तर तो त्यांचा विचार असल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!