---Advertisement---

माजी गृहमंत्री देशमुखांवर गुन्हा दाखल होताच ; खोचक ट्विट व्हायरल !

By team
On: September 4, 2024 5:08 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून नुकतेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने अनिल देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कारण आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्याआधीच सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन आरोपी बनवण्यात आलं आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे. खुद्द प्रवीण मुंढे यांनी सीबीआयकडे तसा जबाब नोंदवला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहे. संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ट्विट करत निशाणा साधला आहे.

“धन्यवाद… देवेंद्रजी फडणवीस! माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहेत. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे”, अशा शब्दांत अनिल देशमुखांनी भूमिका मांडली.
“महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे”, असं अनिल देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!