---Advertisement---

खळबळजनक : दोन चिमुकल्यांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पंधरा किलोमीटर पायपीट !

By team
On: September 5, 2024 12:54 PM
Follow Us:
---Advertisement---

गडचिरोली : वृत्तसंस्था

राज्यातील घडत असलेल्या घटनेच्यानिमित्त विरोधी पक्षाचे नेते सरकारवर हल्लाबोल करीत असतांना आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दाम्पत्यावर प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे त्यापेक्षाही वाईट वेळ आली आहे. दोन चिमुकल्यांचे मृतदेह आपल्याच खांद्यावर घेऊन पंधरा किलोमीटर पायपीट करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता राजकीय पडसाद देखील उमटले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यवस्थेचे भीषण वास्तव दर्शवणारा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक दाम्पत्य आपल्या खांद्यावर दोन मुलांचे मृतदेह घेऊन पायपीट करताना दिसत आहे. वेळेवर रुग्णवाहिक न मिळाल्यामुळे या गरीब आदिवासी दाम्पत्याला आपल्या लेकराचे मृतदेह आपल्याच खांद्यावर घेऊन जावे लागले. पोटचा गोळा गेल्याचे दुःख असताना दुसरीकडे प्रशासनाच्या कारभारामुळे या दुःखात भर टाकण्याचे काम केले गेले. त्यामुळे आता या घटनेवरून राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

गडचिरोली जिल्ह्याचा काया पालट करणार असल्याचा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र, त्यांचा दावा फोल ठरला असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आरोग्यव्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याचा काया पालट करण्यापेक्षा खाण उद्योग आणि त्यावर आधारीत आर्थिक व्यवहार आपल्या हातात असावे, यासाठीच हा जिल्हा स्वतःकडे ठेवला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यासाठी वेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र आजही आदिवासी हा जीवनासाठी संघर्ष करत आहे. आरोग्यवस्था नाही, रस्ते नाही, शाळेची व्यवस्था नाही, त्यामुळे आजही गर्भवती महिलांना देखील झोळीत टाकून प्रवास करावा लागत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!