---Advertisement---

लोअर परळ परिसरात टॉवरमध्ये भीषण आग : मोठी दुर्घटना टळली

By team
On: September 6, 2024 9:27 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना घडत असतांना नुकतेच मुंबईच्या लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल टाईम्स टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे. सकाळी साडेसहा वाजता टाईम्स टॉवरला आग लागल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परळ परिसरातील टाईम्स टॉवर हे कमर्शियल टॉवर असल्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी एकही कर्मचारी नव्हता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. आगीची माहिती कळताच अग्निशामक विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आता एकूण सहा दलाच्या माध्यमातून येथील आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

कमर्शिअल कॉम्प्लेक्स असल्यामुळे या इमारतीमध्ये अनेक कंपन्यांचे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. त्यामुळे या इमारतीला काचेचे टॉवर आहे. त्यामुळे इमारतीच्या बाहेरील बाजूस असलेल्या काचा आणि काही सामान खाली पडताना देखील दिसत आहे. घटनास्थळी मुंबई पोलिस आणि रुग्णवाहिका दाखल झालेले आहेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून आतापर्यंत या आगीत कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!