---Advertisement---

राज्यातील निवडणुकीत तयार होणार तिसरी आघाडी ; संभाजीराजेंनी घेतला पुढाकार

By team
On: September 6, 2024 9:30 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतांना नुकतेच पुण्यातील स्वराज्य पक्षाच्या ‘स्वराज्य भवन’मध्ये स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर, भारतीय जवान किसान पक्षाचे प्रमुख नारायणराव अंकुशे व इतर घटक पक्षांची एकत्रित बैठक गुरुवारी पार पडली. सुसंस्कृत व सक्षम महाराष्ट्रासाठी राज्यात तिसरा पर्याय देण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केला.

या बैठकीला स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, प्रहार पक्षाचे गौरव जाधव, स्वराज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर पाटील आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्राने दुसऱ्या राज्यांना दिशा देण्याचे काम केले. परंतु सध्या राज्यातील राजकारण हेवेदाव्यांपुरते उरले असून, राज्य दिशाहीन झाले आहे. म्हणून सक्षम व सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी आजची बैठक घेतली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हेही आमच्यासोबत आले आहेत. शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे जाण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!