मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे राजकारण तापले असतांना नुकतेच शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी सत्ताधारी नेत्यावर टीकास्त्र सोडले आहे.
आ.रोहित पवार म्हणाले कि, राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या, तर आपण देखील काचेच्या घरात राहतो, हे विसरू नये. त्यांनी ज्या कंपन्या उभ्या केल्या आहेत, त्याबाबत मी आत्ता अजिबात बोलणार नाही. मात्र त्याचे पुस्तक माझ्याकडे तयार असल्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांना दिला आहे. आमदार रोहित पवार यांच्याशी निगडित कारखाने आणि कंपन्यांची चौकशी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याशी निगडित कारखाने आणि कंपन्यांची चौकशी सध्या सुरू आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाला गंभीर इशारा दिला आहे. राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या तर इतरांनी देखील काचेच्या घरात राहतो, हे विसरू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आमदार रोहित पवार यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर देखील जोरदार टीका केली. जो आपल्या पोटच्या मुलीला पाण्यात बुडवण्याची भाषा करतो, यावरून त्यांची विचारधारा काय आहे? हे समोर येत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मंत्री आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलीला हा इशारा दिला होता. यावरून रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. आम्ही कुणाचेही घर फोडलेले नाही मात्र, त्यांची स्वतःची तशी इच्छा असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र याचा सर्वस्वी निर्णय शरद पवार यांचा असल्याचे देखील ते म्हणाले.