ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बाप्पांसाठी बनवा घरीच उकडीचे मोदक

राज्यात आज बाप्पांचे ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. उकडीचे मोदक अनेकांना खूप आवडतात श्री गणेशाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात मोदक चवीने परिपूर्ण असतात जे सहसा खास प्रसंगी म्हणजेच गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून अर्पण करण्यासाठी बनवले जातात. आज गणेशोत्सव आहे आणि गणपती बाप्पाचा आगमन झालेलं आहे. त्याच्या नैवेद्यासाठी चला तर बनवूया तांदळाच्या उकडीचे मोदक..

साहित्य –
तांदळाचे पीठ 2 वाट्या
ओलं खोबरं किसलेले 2 कप
गूळ 1 कप
तूप 2 टीस्पून
वेलची पावडर अर्धा टीस्पून
खसखस 1 टेबल स्पून
मीठ अर्धा टीस्पून

कृती –
उकडीचे मोदक बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात एक चमचा तूप गरम करून त्यात दोन वाट्या खोबरे आणि गुळ घालून परतून घ्या
हे मिश्रण मंद आचेवर परतत असताना त्यामध्ये वेलची पावडर, खसखस घाला
मिश्रण एकजीव होऊन त्यातील पाणी आटेपर्यंत शिजवा
आता दुसरे भांडे घेऊन त्यात एक चमचा तूप ,दोन कप पाणी घाला आणि हे मिश्रण उकळा
या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तांदळाचे पीठ थोडे थोडे घालत मिक्स करा
तांदूळ पीठ सर्व पाणी शोषून घेईपर्यंत एकजीव करा
आता गॅस बंद करून पीठ झाकून पाच मिनिटे बाजूला ठेवा
पीठ थोडे कोमट झाल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये ठेवा आणि ते पीठ मऊ होई पर्यंत चांगले मळा
आता हे पीठ मोदकासाठी तयार आहे
या पीठाचे गोळे बनवा..एक एक गोळा घेऊन त्याची गोल पारी तयार करा. त्यानंतर या पारीमध्ये गुळ खोबऱ्याचे सारण भरून त्याच्या चांगल्या कळ्या पाडून मोदक बनवून घ्या. आता हे तयार केलेले मोदक छान मोदक पात्रात किंवा एका मोठ्या भांड्यात पाणी ठेवून वर चाळण ठेवून त्यामधून वाफवून घ्या. 15 ते 20 मिनिटे वाफ दिल्यानंतर गरमागरम तांदळाच्या उकडीचे मोदक तयार.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!