जालना : वृत्तसंस्था
गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील सरकारशी लढा देत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटलांनी सरकारला इशारा देखील दिला होता. तर नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या मतदारसंघात घोंगडी बैठक घेण्याचा निर्धार व्यक्त केला असून ते म्हणाले कि, मी परिणामाची चिंता करत नाही. श्रीमंत लोकांना आरक्षणाची गरज नाही. त्यांना मराठ्यांची गरज नाही.त्यांना फक्तराजकारणासाठी मराठा पाहिजे. त्यामुळे कुणी काहीही म्हटले तरी बार्शीयेथे मराठा समाजाचीघोंगडी बैठक होणारच, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे.
तर, राऊत यांना दोष देऊन उपयोग नाही. त्यांच्या माध्यमातून फडणवीस मराठ्यांमध्येच वाद निर्माण करून दंगली घडवण्याचे कामकरीत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.दरम्यान, आमदार राऊत यांनी जरांगेपाटलांविरुद्ध भूमिका घेताच बार्शीतून तीनशेहून अधिक गाड्या शनिवारी आंतरवाली सराटी येथे दाखल झाल्या. मी राजगाद्यांना किती मानणारा आहे हेसगळ्यांना माहिती आहे. छत्रपती उदयनराजे, कल्पनाराजे, संभाजीराजे, शाहूराजे यांना मी किती मानतो हे त्यांना माहीत आहे, असेही जरांगे म्हणाले.
राऊत यांच्यासारखे मी खूप बघितले.त्यांनी आता फितुरीचे संस्कार दाखवले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावते खराब करत आहेत. त्याचे उत्तर शिंदे आणि शंभूराज देसाई यांनी दिलेच पाहिजे.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काहीतरी दिलेअसेल, असे जरांगे म्हणाले. आमदार राऊत यांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतल्यानंतर बार्शीयेथून तीनशेहून अधिक चारचाकी गाड्याशनिवारी आंतरवाली सराटी येथे दाखलझाल्या. निष्ठावंत मराठे म्हणून हे सर्वआंतरवाली येथे आले.