ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटलांचा सरकारला निर्वाणीचा इशारा‎ : सहाव्यांदा बसणार ‎‎उपोषणाला

जालना : वृत्तसंस्था

गेल्या‎ वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांनी ‎आंतरवालीत पाच वेळा उपोषण केले असून आता‎ ‎मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी,‎‎ १७ सप्टेंबरपासून ते‎ ‎आंतरवाली येथे सहाव्यांदा ‎‎उपोषणाला बसणार आहेत. ‎‎१६ सप्टेंबरला मध्यरात्री १२ ‎‎वाजता त्यांचे उपोषण सुरु ‎होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला‎ संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु मी‎सुध्दा मराठ्यांसाठी झुंज देण्याचा निर्धार केला‎ अाहे. आता आपली शहीद होण्याचीही तयारी‎ आहे, असे म्हणत सरकारला निर्वाणीचा इशारा‎ दिला. २९ सप्टेंबरऐवजी ते १२ दिवस आधीच‎ उपोषण सुरु करणार आहेत.‎

जरांगे पाटील यांनी २९ सप्टेंबरपासून‎उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती, पण‎मंगळवारी त्यांनी आंतरवाली सराटी येथे‎पत्रकार परिषद घेऊन आता २९ ऐवजी १७‎सप्टेंबरपासूनच उपोषणाला बसणार असल्याचे‎सांगितले. फडणवीस मराठ्यांना संपवण्यासाठी‎झुंजत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच मराठा‎आमदारांना आमच्याविरोधात करत आहेत.‎सगेसोयरे अंमलबजावणी कधी करणार?‎हैदराबाद, गॅझेट केव्हा लागू करणार? गुन्हे कधी‎मागे घेणार? असे प्रश्न त्यांनी विचारले.‎

गेल्या चार दिवसांत कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि अल्पसंख्याक‎विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी आंतरवालीत येऊन, जरांगे‎पाटलांची भेट घेतली होती. दोन्ही भेटी रात्री उशिरा झाल्या होत्या.‎मंत्री सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आपल्याला पुन्हा संपर्क‎करतो असे जरांगे यांना सांगितले होते. त्यानुसार सत्तार यांनी दोन‎दिवसांपूर्वी जरांगे यांना फोनही केला. त्यानंतर जरांगे यांनी उपोषणाचे‎हत्यार उपसले आहे. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या भेटीनंतरही जरांगे यांचे‎समाधान झाले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जरांगे पाटील‎यांनी जाहीर केलेल्या तारखेपुर्वीच उपोषणाचा निर्णय घेतला आहे.‎आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.‎

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!