ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठवाड्यातील ‘लाडक्या बहिणींचे पैसे अडकले ?

छत्रपती संभाजी नगर :  वृत्तसंस्था

राज्यातील शिंदे सरकारने गेल्या महिन्यापूर्वी राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’‎योजना सुरु केली होती. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील महिलांना या योजनेचा फायदा झाला मात्र मराठवाड्यात तब्बल ४.३२ लाख महिलांचे बँक खाते, ‎‎आधारसोबत लिंक नसल्याने, योजनेचा लाभ त्यांना ‎‎मिळवण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे‎आधार लिंक करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या‎बँकांसमोर उन्हा-पावसात रांगा लागत आहेत. तर‎दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने याबाबत बँकांशी समन्वय‎साधावा, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालयाने‎दिल्या आहेत.‎

लाडकी बहीण योजनेमध्ये दरमहा दीड हजार रुपये‎त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. त्यानुसार‎महिलांनी नारीदूत ॲप किंवा लाडकी बहीण योजनेच्या‎वेबसाईटवर नोंदणी केली. ऑनलाइन व आॅफलाइन‎आलेल्या अर्जांची तपासणी होऊन पात्र महिलांच्या बँक‎खात्यात रक्कम जमा केली जात आहे. मात्र त्यासाठी‎बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे.

मात्र‎ मराठवाड्यात तब्बल ४.३२ लाख महिलांचे बँक खाते‎आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात रक्कम‎जमाच झाली नाही. त्यामुळे आता आधार लिंक‎करण्यासाठी महिलांची बँकांसमोर गर्दी होऊ लागली‎आहे. हिंगोली शहरात स्टेट बँक सुरु होण्यापूर्वीच‎महिलांच्या बँकेसमोर रांगा लागतात. महिलांची होणारी‎गर्दी लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने गृहरक्षक दलातील‎महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मराठवाड्यात‎अनेक बँकांमध्ये अशी परिस्थिती कायम आहे.‎

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!