---Advertisement---

काँग्रेसने केले बाप्पाला अटक करण्याचे काम ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

By team
On: September 14, 2024 5:16 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील धाराशिव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाला. यावेळी शिंदे यांनी महाविकास आघाडीवर उपरोक्त टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांनी कर्नाटकात गणपती उत्सव बंद करण्याचे काम केले. काँग्रेसने कर्नाटकात गणपती बाप्पाला अटक करण्याचे काम केले. गणेशोत्सवात गणपती बाप्पांसोबत त्यांनी हे काम केले. ते हे पाप कुठे फेडणार?

कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे बुधवारी रात्री 8 च्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत राडा झाला होता. यामुळे शहरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त तैनात केला. तसेच काही जणांना ताब्यातही घेतले. यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांनी गणपतीची मूर्ती पोलिस व्हॅनमध्ये ठेवली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या कृतीवर आता भाजप व सत्ताधारी पक्षाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकनाथ शिंदेंनीही याच घटनेचा दाखला देत काँग्रेसवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!