---Advertisement---

खळबळजनक : ८० वर्षीय आईसोबत मुलाने घेतली तलावात उडी !

By team
On: September 23, 2024 9:58 AM
Follow Us:
---Advertisement---

अमरावती : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी आत्महत्या केल्याची घटना घडत असतांना नुकतेच अमरावती शहरातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात वरिष्ठ सहायक तथा प्रभारी अधीक्षक म्हणून कार्यरत एका ५४ वर्षीय व्यक्तीने शहरालगत असलेल्या छत्री तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. याच वेळी त्यांच्या ८० वर्षीय आईनेही आत्महत्या केली असावी. कारण दोघांचेही मृतदेह रविवार, २२ सप्टेंबरला छत्री तलावातून काढण्यात आले. त्यांनी घरगुती कारणावरून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज राजापेठ पोलिसांनी वर्तवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मनोहरराव लोणारकर (५४) आणि लक्ष्मीबाई मनोहरराव लोणारकर (८०, दोघेही रा. महारुद्र अपार्टमेंट, दस्तूरनगर, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. लक्ष्मण हे विद्यापीठातील गोपनीय विभागात वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत होते. तसेच अलीकडेच त्यांच्याकडे गोपनीय विभागाच्या अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. दरम्यान, रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास लक्ष्मण यांच्या आई लक्ष्मी यांचा मृतदेह छत्री तलावावर तरंगताना दिसला. त्यामुळे पोलिसांना माहिती मिळताच लक्ष्मीबाईंचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!