---Advertisement---

मनोज जरांगे पाटील आज करणार उपोषण स्थगित !

By team
On: September 25, 2024 3:36 PM
Follow Us:
---Advertisement---

वडीगोद्री : वृत्तसंस्था

अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे आज दि.२५ दुपारी ४ वाजता आपले आमरण उपोषण मागे घेणार आहेत. त्यांच्या या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. अशातच मराठा बांधवांशी त्यांनी संवाद साधला. अखेर त्यांनी आज उपोषण मागे घेणार असल्याचे सांगितले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपोषण उपचार घेऊन उपोषण करण्यापेक्षा उपोषण सोडावे का? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विचारला. त्यानंतर समाजाने त्यांना सकारात्मकता दाखवली. त्यानंतर जरांगे पाटील ४ वाजता उपोषण स्थगित करणार आहेत. मराठा बांधव अंतरवलीत येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जरांगे उपोषण सोडतील. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा आग्रहाने मांडली. त्यानंतर उपोषण मागे घेण्याबाबात उपस्थित मराठा बांधवांना विचारलं. त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय मनोज जरागेंनी घेतला. आपल्या जातीशी, आपल्या लेकरांशी धोका करून पुन्हा नेत्यांच्या मुलांना मोठं करू नका, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे, असं जरांगे म्हणाले.

राज्यभरातून मराठा समाज अंतरवालीकडे येत आहेत. त्यामुळे आता जरांगे पाटील 4 वाजता उपोषण सोडणार आहेत. उपोषण स्थगित करणार आहेत. जरांगेंना भेटण्यासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मुस्लिम समाजबांधवांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती केली. यावेळी या मुस्लिम बांधवांना अश्रू अनावर झाले होते.

मी आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. मला 10- 12 दिवस आरामाची गरज आहे. त्यामुळे दवाखान्यात कुणी येऊ नका. मी जरा आराम करतो. त्यानंतर अंतरवलीला आलो की भेटू. आरक्षण मिळवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही, असं जरांगे म्हणाले. ज्यांनी त्रास दिला. त्यांना सरळ करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तर देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही हाताने सत्ता घालवू नका, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!