ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोलिसांनी केली हवाला रॅकेटचा ‎भांडाफोड : २६ लाखांची रोकड जप्त !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी पोलिसांच्या कारवाई सुरु असतांना नुकतेच बीड शहरात सुरु असलेल्या हवाला रॅकेटचा ‎बुधवारी सायंकाळी बीड ग्रामीण व ‎शहर पोलिसांनी भांडाफोड केला.‎पोलिसांनी ३ ठिकाणी धाड टाकून, २६‎लाखांची रोकड जप्त केली. पाच‎संशयितांना चौकशीसाठी ताब्यात‎घेतले गेले आहे. नोटांवर कोडवर्ड‎लिहून देशभरात हवाल्याचे पैसे‎पाठवले जात होते.‎

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरात हवाला रॅकेट कार्यरत‎असल्याची माहिती पोलिस अधीक्षक‎अविनाश बारगळ यांना मिळाली होती.‎त्यांनी बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक‎पोलिस निरीक्षक बाळराजे दराडे यांना‎कारवाईचे आदेश दिले होते. एपीआय‎दराडे, पीएसआय नितीन काकरवाल,‎पीएसआय ज्ञानेश्वर कुकलारे‎यांच्यासह शहर ठाण्याचे पीआय‎शितलकुमार बल्लाळ, एपीआय बाबा‎राठोड यांच्या पथकाने बीड शहरातील‎डीपी रोडवरील सारडा सेंट्रल, कबाड‎गल्ली व जालना रोडवरील सहकार‎भवन परिसरात अशा तीन ठिकाणी‎छापेमारी केली. एका ठिकाणाहून १८‎लाख, दुसऱ्या ठिकाणाहून ३ लाख तर‎तिसऱ्या ठिकाणाहून ५ लाख अशी‎सुमारे २६ लाख रुपयांची रोकड जप्त‎करण्यात आली आहे. हवालामार्फत‎राज्य व राज्याबाहेर विविध ठिकाणी हे ‎‎व्यवहार होत होते. पोलिसांनी छापेमारी ‎‎केलेल्या कार्यालयातील पाच तरुणांना ‎‎चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.‎दुचाकी, मोबाईल, नोटा मोजण्याच्या ‎‎मशीन जप्त केल्या आहेत.‎

हवाला रॅकेटमध्ये पैसे जमा ‎केल्यानंतर संबंधिताला ‎एका नोटवर एक क्रमांक ‎लिहून जात होता. त्या ‎क्रमांकाच्या आधारे ‎समोरच्या व्यक्तीकडून ‎दुसऱ्या ठिकाणी रक्कम ‎मिळत होती. यात ‎रकमेनुसार २ ते १० ‎हजारांपर्यंत कमशीन ‎हवाला चालकाला मिळत ‎असल्याचे सूत्रांनी ‎सांगितले. ‎ मोठ्या प्रमाणावर रक्कम जप्त केल्यानंतर शहर ठाण्यात‎या नोटांची मोजदाद करण्यासाठी पोलिसांना नोटा‎मोजण्यासाठी मशीन वापरावी लागली. रात्री उशीरापर्यंत‎या प्रकरणात चौकशी व नोंद करण्याचे काम सुरु होते.‎

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!