---Advertisement---

मोठी बातमी : पंतप्रधान मोदींचा राज्यातील दौरा रद्द ; पावसाचा बसला फटका

By team
On: September 26, 2024 10:54 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना भाजपने देखील निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. नुकतेच दि.२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर येवून गेले त्यानंतर आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम होणार होता मात्र आता पुणे दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहितीसोर आली आहे. स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सभास्थळी चिखल झाला आहे. तसेच आजही पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे लोकार्पण होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे भूमिपूजनही होणार होते. कालपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड चिखल झाला होता. त्यामुळे पर्यायी जागा म्हणून गणेश क्रीडा कला केंद्राच्या सभागृहात मोदींची सभा घेण्याचा विचार सुरु होता. मात्र, या सभागृहातील कार्यक्रम खुल्या मैदानाच्या तुलनेत लहानच होईल.

त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पुणे दौरा रद्द केल्याचे समजते. त्यामळे पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांनादेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!