ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तर पोलिसांनी बंदूकी शोकेस मध्ये ठेवल्यात का? ; मुख्यमंत्री शिंदे

पुणे : वृत्तसंस्था

पुणे शहरात मेट्रोच्या मार्गिकेसह एकूण 22,000 हजार कोटीच्या विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर एन्काऊंटरचा विषय काढला. बदलापूर एन्काऊंटरवरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. या वादाचे पडसाद पुण्यातील मेट्रोच्या कार्यक्रमात देखील उमटले. यावेळी टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी दोन्ही बाजूंनी बोलायची सवयच आहे. बदलापूर प्रकरणात आधी म्हणत होते. आरोपीला भरचौकात फाशी द्या. आता आरोपीने पोलिसांवरच गोळीबार केला तर पोलिसांनी बंदूकी शोकेस मध्ये ठेवल्यात का? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की पुणे मेट्रोचा कार्यक्रम खरेतर गुरुवारी होणार होता. परंतू पावसामुळे उद्घाटन होऊ शकले नाही. सर्वकाही तयारी होती. परंतू लोकांना त्रास होईल म्हणून पंतप्रधानांनी स्वत: हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती केली. इतके संवेदनशील आपले पंतप्रधान आहेत. परंतू विरोधक दोन्ही बाजूंनी बोलतात. आम्ही करतो उद्घाटन असे विरोधक बोलू लागले. दोन्ही बाजूंनी बोलतो चालतो त्याला काय म्हणतात ? माहीती आहे का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांंनी यावेळी केला. तेव्हा उपस्थितांतून मांडुळ असा उल्लेख होऊ लागला.

मोदी बाहेरच्या देशात जाऊन देशाची शान वाढवत आहेत, मात्र दुसरीकडे ज्यांना देशात बोलण्याची हिंमत होत नाही ते बाहेर जाऊन बोलत असतात असा उल्लेख करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांचे नावं न घेता त्यांना टोला हाणला. पुण्याच्या या नवीन मेट्रो मार्गांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!